तुमच्यासाठी अजून काही उत्तरे
- पिरियड पेनची कारणे काय आहेत?
- पिरियड सुरू झाल्यावर पोटातलं दुखणं मांडीपर्यंत का जाणवतं?
- पीरियड पेन लगेच कमी करण्यासाठी काय करता येईल?
- पीरियड पेन वर सर्वोत्तम उपचार कोणता आहे?
- पीरियड दरम्यान पाठ का दुखते?
- पीरियडमधील पोटदुखीपासून त्वरित आणि नैसर्गिकरित्या आराम कसा मिळवावा आणि त्यावर नियंत्रण कसं ठेवावं?
- पीरियडमध्ये मला जुलाब (डायरिया) का होतात?
पीरियड पेन, ज्याला ‘डिसमेनोरिया‘ असंही म्हणतात, हे प्रामुख्याने तुमच्या पोटाच्या खालच्या भागात, जिथे गर्भाशय (युट्रस) असतं, तिथे येणारे क्रॅम्प्स किंवा ठणकणारी वेदना असते. जरी हे दुखणं मुख्य लक्षण असलं तरी भारतात याकडे अनेकदा स्त्रीच्या ‘सामान्य’ आयुष्याचा एक भाग म्हणून दुर्लक्ष केलं जातं, या वेदनांसोबत इतर काही समस्या जाणवत असतील, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.
या लक्षणांकडेही तुम्ही नक्की लक्ष द्यायला हवं:
- तुमच्या पाठ आणि मांडीच्या भागात सतत हलकी वेदना जाणवणे.
- पीरियड च्या आसपास मळमळ, उलट्या होणं किंवा जुलाब होणं.
- तुम्हाला खूप थकल्यासारखं वाटण, डोकेदुखी आणि थकवा जाणवणं.
- पोट फुगल्यासारखं वाटणं किंवा पोट जड झाल्याची भावना येणं.
एका अंदाजानुसार, भारतातील जवळपास ८०% मुली आणि स्त्रियांना डिसमेनोरिया चा त्रास होतो. जर तुमचा पीरियड पेन ‘मध्यम’ ते ‘असह्य’ पातळीवर असेल, किंवा त्यासोबत धोक्याची (रेड फ्लॅग) लक्षणं दिसत असतील, तर तुम्ही नक्कीच स्त्रीरोग तज्ज्ञांना भेटायला हवं.
अंदाज लावणं थांबवा, आता जाणून घ्यायला सुरुवात करा.
पीरियड पेन कॅल्क्युलेटर तुम्हाला तुमच्या वेदनेची तीव्रता ठरवण्यास आणि डॉक्टरांशी आत्मविश्वासाने बोलण्यासाठी आवश्यक असलेले ‘रेड फ्लॅग्स’ (धोक्याचे इशारे) समजून घेण्यास मदत करतो.
तुमचा #स्टॉप-द-पीरियडपेन प्रवास इथून सुरू होतो
दर महिन्याला, करोडो भारतीय मुली आणि महिला पिरियडच्या वेदना दडपून सहन करतात, कारण त्यांना सांगितले जाते की तीव्र पिरियड वेदना (डिसमेनोरिया) सामान्य आहे. आमचे उद्दिष्ट ही गुप्तता मोडणे आहे. #स्टॉप-द-पीरियडपेन मोहिम तुम्हाला ३ सोप्या सत्यांद्वारे सशक्त करण्यासाठी येथे आहे.
तुमच्यासाठी अजून काही उत्तरे
- पिरियड पेनची कारणे काय आहेत?
- पिरियड सुरू झाल्यावर पोटातलं दुखणं मांडीपर्यंत का जाणवतं?
- पीरियड पेन लगेच कमी करण्यासाठी काय करता येईल?
- पीरियड पेन वर सर्वोत्तम उपचार कोणता आहे?
- पीरियड दरम्यान पाठ का दुखते?
- पीरियडमधील पोटदुखीपासून त्वरित आणि नैसर्गिकरित्या आराम कसा मिळवावा आणि त्यावर नियंत्रण कसं ठेवावं?
- पीरियडमध्ये मला जुलाब (डायरिया) का होतात?
आमचा पीरियड वेदना कॅल्क्युलेटर वापरून पाहा
तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का की तुमची पिरियडची वेदना खरोखर किती गंभीर आहे? काही सोप्या प्रश्नांची उत्तरे देऊन लगेच समजून घ्या की तुमची वेदना सामान्य आहे की एखाद्या मोठ्या समस्येचे संकेत.
